मसुरे,दि.३० जुलै (झुंजार पेडणेकर)
श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान (पादुका मठ)श्री क्षेत्र खोटले येथे मोठया संख्येने भविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा सोहळा साजरा झाला.
सकाळी पादुका अभिषेक, शोडशोपचारे पूजा संपन्न झाली.
संध्याकाळी हभप श्री विजय परब यांनी हरिपाठ तर
श्री स्वामी सुत महाराज विरचित स्वामी पाठ अनेक भविकांनी केला.
रात्री 8 वा. श्री. जैन सातेरी प्रा. भजन मंडळ, वालावलं बुवा श्री भूषण घाडी आणि सहकारी यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला.
रात्री 10 वा. श्री माऊली प्रा. महिला भजन मंडळ, हेदूळ गायिका कु. वैष्णवी सचिन शेमडकर यांनी स्वामी भजनाचे सादरीकरण केले.
दुपारी 1 ते रात्री 10:30 पर्यन्त अखंड महाप्रसाद व्यवस्था केली होती.
या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन मठाधिपती श्री. गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने श्रद्धास्थान उत्सव समिती यांनी केले होते.