मसुरे : मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा..

शेअर करा


मसुरे ,दि. २१ जून

मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी आचरा येथील योग्य प्रशिक्षक श्रीमती मनाली पाठक यांनी योगाचे यथायोग्य मार्गदर्शन केले व त्यानंतर योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. योगा मुद्रा प्राथमिक हालचाली टपाल भारती प्राणायाम सेवासन शासन ताडासन आधी आसनांबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना यथायोग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर मॅडम यांनी योगा प्रशिक्षक मनाली पाठक मॅडम यांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या योग दिनासाठी मनाली पाठक, प्रभारी मुख्याध्यापिका संजना मसुरेकर, सौ अर्चना कोदे श्री समीर नाईक, श्री रमेश पाताडे, श्री अनिल मेस्त्री उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी श्री रमेश पाताडे यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा