गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
मसुरे,दि.२७ जुलै (झुंजार पेडणेकर)
देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र संतपीठ श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड (संचालित: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई) यांच्या वतीने २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत.
स. ७.०० ते १०.००: गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन व होमहवन,
१०.०० ते ११.००: लघुरुद्र (एकावेळेस १०१ भाविकांना लघुरुद्र लाभ घेता येईल),
स. ११.०० ते १२.००: सामूहिक नामस्मरण,
दु. १२.०० ते १२.३० महाआरती,
दु.१.०० ते ३.०० महाप्रसाद,
दु. ३.०० ते ४.०० वा.१० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा.
सायं. ५.०० ते ८.००: भक्तीमय कार्यक्रम.
या उत्सवाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.स्वामी भक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी महाराजांचा आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई
संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ मुंबई, गाव समिती – हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष
श्री. प्रभाकर धाकू राणे, संस्थापक सचिव
श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, खजिनदार
श्री. ज्ञानेश्वर श्यामसुंदर राऊत
यानी केले आहे.