मुंबई : मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या शुभेच्छा..

शेअर करा

राणे बंधूंमध्ये झाली गळाभेट …

मुंबई,दि.२३ जून

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा आमदार निलेश राणे यांनी मुंबई येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी दोन्ही बंधूंमध्ये विविध विषयांवर मनमोकळा संवाद झाला. राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच प्रभावी नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राणे बंधूंची ही भेट कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

निलेश राणे यांनी नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच समाजसेवा आणि जनहिताच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून राज्याच्या विकासात त्यांचे योगदान अधिकाधिक वाढत राहो, अशी अपेक्षाही आ.निलेश राणे यांनी व्यक्त केली.

शेअर करा