मुंबई : ‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाचे नितेश राणेंनी घेतले मनोभावे दर्शन

शेअर करा

मुंबई,दि.१६ सप्टेंबर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज कुटुंबीयांसह मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी सौ. ऋतुजा वहिनी नितेश राणे आणि चि. निमिष राणे आदी कुटुंबीय उपस्थित होते. नितेश राणे यांनी श्री गणरायाची विधिवत आरती करून पूजा-अर्चा केली.

श्री गणरायाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसह सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

यावेळी गणरायाच्या आशीर्वादाने राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि विकासाची नवी पर्वणी सुरू राहावी, अशी भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.

शेअर करा