आषाढी एकादशीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी तारा-मुंबरी येथील विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन

शेअर करा


देवस्थानच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत; विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरण

देवगड,दि.२५ जुलै

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी देवगड तालुक्यातील तारा-मुंबरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी तारा-मुंबरी देवस्थानच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी, सौ. जोशी, शिवाजी कांदळगावकर, ज्ञानेश्वर खवळे, धर्मराज जोशी, विलास नावगे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी…” या अखंड नामघोषाने संपूर्ण तारा-मुंबरी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला.

धार्मिक श्रद्धा, वारकरी परंपरा आणि भक्तीभावाचा संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्यामुळे तारा-मुंबरी परिसरात आषाढी एकादशी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.

शेअर करा