फोंडाघाट ,दि.२५ जुलै (संजय सावंत)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ व २३ जुलै २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत १४वर्षे वयोगट व २६ किलो वजनी गट(मुले )या विभागात वरूण देसाई : द्वितीय क्रमांक तर 30 किलो वजनी गटामध्ये रुद्र शिंदे याने तृतीय क्रमांक मिळवीला व
४० किलो वजनी गटामध्ये पार्थ सांडिम याने तृतीय क्रमांक मिळवीला.
याचबरोबर १४ वर्षे वयोगट व ४० किलो वजनी गट(मुली) या विभागात लतिका राणे हिने तृतीय क्रमांक मिळवीला असून १७ वर्षे वयोगट ४६ किलो वजनी गट(मुली)या विभागामध्ये ऋतुजा चव्हाण हिने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला व १७ वर्षे वयोगट ४० किलो वजनी गट (मुले ) या विभागामध्ये जय देसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ४५ किलो वजनी गट दुर्वांक नातू याने तृतीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगट ४५ किलो वजनी गट (मुले) या विभागात रोहित चौहान याने द्वितीय क्रमांक
तर ५० किलो वजनी गटामध्ये तेजस पारकर याने तृतीय क्रमांक मिळविला व ५५ किलो वजनी गटामध्ये सिद्धेश सांडिम याने प्रथम क्रमांक मिळवीला,६० किलो वजनी गटामध्ये शुभम चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळविला, ६६ किलो वजनी गटामध्ये आकाश गोंधळी याने प्रथम क्रमांक पटकावला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारे ऋतुजा चव्हाण, जय देसाई, सिद्धेश सांडिम, शुभम चव्हाण आणि आकाश गोंधळी यांची कोल्हापूर विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अ.वि.पोफळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.म.ज.सावंत,सेक्रेटरी मा.चं.शा. लिंग्रस,खजिनदार मा.वि.रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.द.दि.पवार, मा.संचालक, मुख्याध्यापक प्र.कृ.पारकर, पर्यवेक्षक वि.पां.राठोड तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.