उद्योजक नंदकुमार घाटे यांच्यासह मान्यवरांकडून नूतन अध्यक्षांचे अभिनंदन
देवगड,दि. १९ ऑगस्ट
देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी प्रकाश राणे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत प्रकाश राणे यांच्या नावाला सूचक म्हणून अभय बापट, तर अनुमोदक म्हणून समीर पेडणेकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील मरबळ यांनी काम पाहिले.
निवडीनंतर उद्योजक नंदकुमार घाटे यांनी नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले.
यावेळी बँकेचे संचालक अमोल तेली, समीर पेडणेकर, वैशाली तोडणकर, सुरेंद्र चव्हाण, संजय बांदेकर, बाबा आचरेकर, दिनेश घाटे, ललिता शेडगे आणि राजन चिके आदी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन प्रकाश बोडस, पंचायत समिती सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे ,जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, सुनील पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, देवगड-जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, ज्ञानेश्वर खवळे, भूषण बोडस, नरेश डांबरी, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, बापू जुवाटकर ,अभिषेक गोगटे, व्ही. सी. खडपकर , गोविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड अर्बन बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


तसेच उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या निवासस्थानी नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांनी भेट घेतली यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांनी प्रकाश राणे यांना पुष्प गुच्छ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या