विलये येथील मेढेकरवाडीत नळपाणी योजनेचा आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते शुभारंभ
राजापूर,दि.१७ सप्टेंबर
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा अभियानाला’ राजापूर तालुक्यातील विलये गावातुन उत्साहात सुरुवात झाली. माजी महापौर रमेश मेढेकर यांच्या मेढेकरवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विलये-मेढेकरवाडी येथील नागरिक उपस्थित होते.
मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यातील हा पहिला सेवा उपक्रम असून, जनतेच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक व जनसेवा उपक्रम राबविण्यात येणार असून, ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ या भावनेतून हे अभियान व्यापक स्वरूपात राबविले जाणार आहे.