रत्नागिरी : ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का…विधानपरिषद निवडणुकीत बाळ मानेंची माघार

शेअर करा

रत्नागिरी,दि.०४ जुन

कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी आज ( शिवसेना ) उबाठा गटाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी भाजप मंत्री नितेश राणे हे उपस्थित होते . त्यामुळे ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

उमेदवार बाळ माने म्हणाले की, निवडणुकीचा घोडेबाजार आणि मतदारांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला यश मिळणे दूर वाटते. त्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनिल तटकरे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

शेअर करा