संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; पत्रकार परिषदेत शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा निता कविटकर-सावंत यांचा विश्वास
सावंतवाडी,दि.१६ ऑगस्ट
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आमदार दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने आमदार होतील असा विश्वास शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता कविटकर सावंत यांनी व्यक्त केला.
संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम हाती घेतले जातील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तेव्हा त्यांना प्रश्न केला असता त्या बोलत होत्या. यावेळी सभापती सुष्मिता जाधव, तालुका प्रमुख नारायण राणे व दिनेश गावडे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस,व पदाधिकारी उपस्थित होते.
संजू परब सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून प्रेरणादायी काम करत आहेत. आमदार दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने ते आमदार बनतील असे अँड निता कविटकर सावंत यांनी सांगितले.