सावंतवाडी : शेर्ले येथे संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

शेअर करा

सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट


शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र शाळा नं. १ शेर्ले येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोपे आणि ओळखपत्रांचे (आयकार्ड) वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या गरजेनुसार भिंतीवरील घड्याळे आणि पंखे भेट देण्यात आले.
​या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी, सरपंच सौ. प्रांजल जाधव आणि महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ. श्रावणी धुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
​तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत जाधव, उपाध्यक्ष सौ. उत्कर्षा केरकर, मुख्याध्यापक श्री. कराड व शिक्षक वृंद, श्री. शांताराम धुरी, शाखाप्रमुख श्री. अनिल पिंगुळकर, युवासेना उपतालुकाप्रमुख श्री. साहिल खोबरेकर, धुरी बाई, श्री. बाबा धुरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

शेअर करा