सावंतवाडीत २९ व ३० ऑगस्टला पाणी व अन्नपदार्थ परीक्षण शिबिर

शेअर करा

​सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट


सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा नियमांतर्गत पाणी आणि अन्नपदार्थ परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी संकुलन येथील पत्रकार कक्षाच्या शेजारील खोलीत होईल.
​व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी तालुक्यातील व्यावसायिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. परीक्षणासाठी लागणाऱ्या विशेष पाणी बॉटल्स व कंटेनर आदल्या दिवशी भारतमाता हॉटेल येथून मिळतील.
​महत्त्वाच्या सूचना: एक लिटरची पाण्याची बाटली पूर्ण भरून आणावी व त्यावर ‘पाणी सँम्पल’ लिहावे.​अन्नपदार्थाचा नमुना डब्यात भरताना तो पूर्ण थंड करून भरावा व पदार्थाचे नाव लिहावे.​अन्नसुरक्षा परवान्याची झेरॉक्स प्रत, त्यामागे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि उपलब्ध असल्यास जीएसटी (GST) नंबर लिहून आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेअर करा