सावंतवाडी : कै. शिवराम सांडये यांच्या स्मरणार्थ नेमळे शिक्षण संस्थेला ५० हजारांची कायमस्वरूपी ठेव

शेअर करा

मुलगा अरविंद सांडये यांचा पुढाकार; दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी दिले जाणार पारितोषिक

सावंतवाडी दि.१५ सप्टेंबर
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य व सेक्रेटरी कै.शिवराम आत्माराम सांडये यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा अरविंद शिवराम सांडये रा.नेमळे सध्या नोकरीनिमित्त रत्नागिरी येथे राहत असून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेकडे कायम स्वरूपी पन्नास हजार रुपये ठेव नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे सचिव पांडुरंग दळवी उपस्थित होते. याठेवीतून दरवर्षी दहावीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व बारावीतील आर्ट्स आणि काॅमर्समधून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना या ठेवीतून कायम स्वरूपी बक्षीस जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठीआणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले हे योगदान निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.या उदात्त देणगीबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ , संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक आर.के .राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अरविंद सांडये यांचे मनःपूर्वक आभार व कृतज्ञता व्यक्त केले.

शेअर करा