सावंतवाडी, दि. ०८ जुलै
प.पू. श्री सद्गुरू मियांसाब यांचा ८१ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा शुक्रवार, दि. १० जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी समाधीस्थानी हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न होणार आहे.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते ९.०० वाजेपर्यंत श्री सद्गुरू पूजन होईल. त्यानंतर सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यंत श्रींची प्रार्थना आणि नामस्मरण चालेल. दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
दुपारच्या सत्रात ३.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत नामस्मरण आणि कीर्तन होईल. त्यानंतर ६.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी आणि श्री एकनाथ भागवत वाचन होईल. उत्सवाची सांगता रात्री १०.०० ते १२.०० या वेळेत श्रींचे भजन, श्री हरिपाठ आणि आरतीने होईल.
या वर्षाच्या उत्सवाचे मानकरी श्री. सुनील वसंत सावंत हे आहेत. पुरोहित म्हणून श्री. सुरेश पुराणिक सेवा देतील.
याशिवाय, वर्षभरात गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, श्री गुरुद्वादशी, श्री दत्त जयंती आणि श्रीराम नवमी साजरा केला जातो.