“नेत्यांचा पाठिंबा, कुटुंबाची पुण्याई आणि जनतेच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात दुसरे तर तालुक्यात पहिले मताधिक्य मिळाले”
सावंतवाडी दि.२८ मे
जनकल्याणाचा वारसा घेऊन जनतेच्या आशिर्वाद व नेत्यांचा पाठिंबा अन् कुटुंबाच्या पुण्याईच्या जोरावर मी जिल्हा परिषद निवडणूकीत जिल्ह्यातून दुसऱ्या व तालुक्यातून पहिल्या क्रमांकाच मताधिक्य घेऊ शकलो असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले. येथील भारतील जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.
श्री. सावंत म्हणाले, स्व. विकास सावंत यांच्या निधनाने मोठी हानी आमची झाली आहे. मात्र, समाजासाठी कार्य करताना या दुःखाची जाणीव होत नाही. म्हणूनच आजचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच काम माझ्या कुटुंबाने केलं असून तोच वारसा पुढे घेऊन जायचा आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंची साथ मला लाभली. माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकास भाईंची पुण्याई अन् सोबत असणाऱ्या लोकांची शिदोरी यावरच मी जिंकू शकलो. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी बळ दिल्याने मोठं मताधिक्य घेऊ शकलो असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. विक्रांत सावंत यांच भविष्य उज्वल आहे. कुटुंबाचा वारसा त्यांना असून त्यांनी भाजपात याव अशी आमची इच्छा होती. त्यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी तालुक्यातील भाजपची ताकद आणखीन वाढली आहे. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजप पक्षाकडून वृक्ष देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, सभापती प्रतिक बांदेकर, सरपंच विजय गावडे, उपसरपंच भरत गांवकर, संजय कानसे, अशोक माळकर, प्रवीण देसाई, प्रा. केदार म्हसकर, प्रसाद गावडे आदी उपस्थित होते.