सावंतवाडी,दि.१२ सप्टेंबर
पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत ‘आरती’ मासिकातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी कथा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लेखकांनी ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपल्या स्वलिखित कथा पाठवाव्यात, असे आवाहन संपादकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांच्यातर्फे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक १,००० रुपये, द्वितीय ८०० रुपये, तृतीय ६०० रुपये आणि ३ कथांसाठी प्रत्येकी ३०० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेत न उतरलेल्या मात्र प्रसिद्धीयोग्य कथा किंवा कविता स्वीकारल्यास त्या ‘आरती’ मासिकातून टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जातील.
स्पर्धेच्या अटी व नियम:
कथा स्वतंत्र असावी, अनुवादित असू नये.
कथेच्या शीर्षकावर मध्यभागी ‘कथा स्पर्धा २०२६ साठी’ असे लिहावे व कथेचे नाव नमूद करावे.
कथेवर स्वतःचे नाव न लिहिता स्वतंत्र कागदावर लेखकाचे नाव, कथेचे नाव आणि संपूर्ण पत्ता लिहावा.
मूळ कथा पाठवावी (झेरॉक्स प्रत स्वीकारली जाणार नाही).
लेखन सुवाच्य आणि कागदाच्या एकाच बाजूने लिहिलेले असावे.
लेखकांनी आपली कथा ‘संपादक आरती, द्वारा श्री. भरत गावडे, विजयदुर्गा अपार्टमेंट, ए विंग, फ्लॅट नं. ००१, भटवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०’ (मोबा. ९४०३०८७७९६) या पत्त्यावर मुदतीत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.