सावंतवाडी, दि. ६ जुलै
आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता जपत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी स्तुत्य काम केले.
या प्रशालेतील इयत्ता दहावी १९९८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी अत्याधुनिक पद्धतीचे स्वच्छतागृह उभारून दिले, तर १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील एका वर्गखोलीचे सीलिंग करून ती फॅन व एलईडी लाईटसह सुसज्ज केली तसेच कल्पेश आजगावकर यांनी प्रशालेच्या भिंतीना पेस्ट कंट्रोल करून दिलं.
या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होणार असून, शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती आपुलकी व्यक्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
उद्घाटन प्रसंगी म्हापसा गव्हर्मेंट आयटीआय चे प्राचार्य सुभाष रेडकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गजानन काकतकर,प्रसाद सांगुडकर,प्रशांत सावंत,माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर,शिक्षक पालक उपाध्यक्ष सानिका तिरोडकर,शिक्षक पालक सहसचिव हेमंत आडारकर, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष दिनानाथ काळोजी, मोहन पांढरे,काव्या साळवी , मानसी परुळेकर ,डीएड कॉलेज चे मारुती कांबळे,श्री तुंगार ,प्रसाद मेस्त्री,बाळकृष्ण हळदणकर,प्रमोद पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी माजी विद्यार्थ्याचे कौतुक करून प्रशालेला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
उपस्थितांनीसुद्धा माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या या उपक्रमामुळे इतरही आजी – माजी विद्यार्थ्यांनाही समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानाबद्दल प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले.भविष्यातही अशाच प्रकारे शाळेच्या विकासासाठी सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षाही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मोहन पांढरे,महेश काळोजी,कल्पेश आजगावकर,कविता चराटकर,सुवर्णा मुळीक,सुप्रिया कोचरेकर,ललिता मुळीक,दर्शना मुळीक, भक्ती शेटकर ,प्रसाद मेस्त्री,वासुदेव सावंत, प्रविण मुळीक,भगवान पांढरे,सचिन आपटे माजी विद्यार्थी उपस्थित होते.