​सावंतवाडी: भटवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात २५ जुलैला आषाढी एकादशी उत्सव

शेअर करा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी,दि.२२ जुलै

भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
​उत्सवानिमित्त सकाळी ५:३० वाजता काकड आरती आणि सकाळी ७ वाजता श्री विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगावच्या विद्यार्थ्यांकडून अभंग गायन सेवा सादर केली जाईल.
​सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत ‘स्तोत्र सखी परिवार, सावंतवाडी’ यांच्यावतीने देवी-देवतांच्या स्तोत्रांवर आधारित भक्तिपूर्ण व संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाआरती आणि रात्री ८ वाजल्यापासून भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
​२९ जुलैला पालखी भेट
बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडी विठ्ठल मंदिरातील पालखी भटवाडी येथील विठ्ठल मंदिरात भेटीसाठी येणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, भटवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा