दुचाकींच्या सीट्स फाडण्याच्या घटनांमुळे संताप; उपाययोजना न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात फाटलेल्या सीट्स व कचरा नेण्याचा राघवेंद्र चितारी यांचा इशारा.
सावंतवाडी,दि.०२ जुन
सावंतवाडी,शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून दुचाकी गाड्यांच्या सीट्स फाडण्याचे प्रकार वाढत चालले आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात फाटलेली सीट अन् कचरा नेऊन ठेवणार असा इशारा भारतीय जनता पार्टीचे बुथ अध्यक्ष राघवेंद्र चितारी यांनी दिला आहे.
ते म्हणाले, भटक्या कुत्र्यांकडून चितार आळी भागात हैदोस सुरू आहे. दुचाकीच्या गाड्यांच्या सीट्स फाडून मोठं नुकसान त्यांच्याकडून होत असुन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास फाटलेली सीट आणि कचरा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात नेऊन ठेवणार असा इशारा श्री. चितारी यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार सालईवाडा भागात घडला होता. आता असाच प्रकार चितारआळी भागात झाला असून प्रशासनाच्या कारभाराबाबत श्री. चितारी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.