चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; प्रवाशांची तत्काळ मदत, आंबोली पोलिसांची घटनास्थळी धाव.
सावंतवाडी,दि.०२ जुलै
सावंतवाडी- बाहेरचावाडा येथील कुटुंबाची कार आंबोली घाटातील मोरीत कलंडली. या अपघातामध्ये तिघांना दुखापत झाली आहे.यात चालक शहबाज रखानजी (वय ३५), अमन बेग (वय २२), नजीम सय्यद (वय ३५), अब्रार चौधरी (वय २५) जखमी झाले आहेत. चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला. यात गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीत कोसळली. यावेळी प्रवाशांनी अपघातग्रस्तांना मदत केली. आंबोली पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही केली. गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी या मदत कार्यात सहकार्य केले.