सावंतवाडी : बालदिंडीत बालचमूनी साकारली विठ्ठल रखुमाई

शेअर करा

सावंतवाडी ,दि.२३ जुलै

सावंतवाडी शहरातील विद्याभारती सिंधुदुर्ग संचलित वसंत शिशूवाटिका च्या बालचमूनी आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढली ही बालदिंडी लक्षवेधी ठरली यात बालचमू बरोबर पालक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ही बालदिडी येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाली यावेळी अनेकांनी मुलांनी साकरलेल्या विठ्ठल रखुमाई च्या हुबेहुब प्रतिकृती बद्दल अभिनंदन केले.
सावंतवाडी शहरात प्रत्येक शाळेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढण्यात येत असते तशीच दिंडी वसंत शिशूवाटिका च्या माध्यमातून काढण्यात आली शिशूवाटिके पासून विठ्ठल मंदिर पर्यत दिंडी काढण्यात आली यावेळी सकाळ च्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम करण्यात आली मुलांनी पालखी तसेच विठ्ठल रखुमाई साकार करत उपस्थितांची व्हाव्हा मिळवली.

शेअर करा