​सावंतवाडी: शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदरासह गोवा व कोकणाला जोडण्याचा आग्रह

शेअर करा

सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल-आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी,दि.९ ऑगस्ट
शक्तीपीठ महामार्गाचा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा तसेच रेडी बंदर, मुंबई गोवा महामार्ग, कोकण एक्स्प्रेस महामार्ग व सागरी महामार्गासह रेडी बंदराला जोडला जाईल असे सर्वेक्षण करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली असून याबाबत सर्वेक्षण होईल आणि नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत कोकणासह महाराष्ट्र राज्याच्या हिताचा निर्णय होईल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याबरोबरच कोकणातील रेडी बंदर, मुंबई गोवा महामार्ग, कोकण एक्सप्रेस सह प्रमुख महामार्गांना जोडला जावा. त्या दृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले आहेत. हा महामार्ग जोडल्यास कोकण विकासाला आणि येथील स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी दिली.
आमदार दिपक केसरकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. ते म्हणाले मतदार संघातील प्रमुख प्रश्नाबाबत मुंबईत बैठक झाली. यातील शक्तिपीठ महामार्ग सध्या ज्या पद्धतीने सुरू आहे त्याचा विशेषतः वेंगुर्ले बंदराच्या विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडला जावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यांनी ती मान्य केली असून या मागणीबाबत लवकरच पुन्हा पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षण (सर्वे) होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
​कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करताना स्थानिक व्यापार आणि बंदरांचा वापर वाढणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग जर थेट गोव्याच्या दिशेने निघून गेला, तर स्थानिक अर्थकारणाला त्याचा फारसा लाभ मिळणार नाही.हा महामार्ग मळगाव येथून जोडणी मिळाल्यास रेडी बंदराच्या मालवाहतुकीला आणि विकासाला मोठी गती मिळेल.या कनेक्टिव्हिटीमुळे वेंगुर्ला बंदराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला चालना देखील चालना मिळणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडल्यास वाहतूक अधिक जलद व सोयीस्कर होईल.
​कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक व्यावसायिकांना थेट समृद्धीचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गात बदल करणे गरजेचे आहे, असे सांगत या संदर्भातील सर्वेक्षणासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आमदार केसरकर म्हणाले. दरम्यान या मार्गाद्वारे चौकुळ हा उंचावरील शेवटचा गाव देखील कनेक्ट केला जाणार आहे. तेथून तो दोडामार्ग तालुक्याला जोडला जावा तर पुढे तेरवण मेढे व मोर्ले पारगड ते कोनाळकट्टा व मुख्य रस्ता मिळतो त्या दोन पैकी एक मुख्य रस्ता द्वारे हा महामार्ग गोव्याला कनेक्ट होईल. त्यांनतर चंदगड गोवा मळगांव मार्गे दुसऱ्या कोकणातील रस्त्यांशी जोडेल असे केसरकर यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग थेट कोकणशी जोडायला बांदा येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ बागायती प्रभावित होईल परिणामी त्यात बदल करण्यात आला असून तो लागवडीचा भाग टाळता येईल याकरिता प्रयत्न आहेत. पुन्हा या महामार्गाचा सर्व्हे होऊन आंबोली चौकुळ पठार याना जोडला गेल्यास मोर्ले पारगड रस्त्या मार्गे दोडामार्ग तिलारी मार्ग नॉर्थ गोवा, साऊथ गोव्याशी कनेक्ट होईल अशी माहिती आम केसरकर यांनी दिली.
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

मतदार संघातील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री ना बोर्डीकर यांच्यासोबत आपली बैठक झाली. या भागात ५६ टक्के ग्रिन कव्हर असल्याने सातत्याने वादळात वीज प्रवाह खंडित होतो त्यामुळे अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाला पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जंगलातून केबल न टाकता हायवेद्वारे ती टाकावी अशी सुचना केल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग वीज प्रश्न निकाली काढला जाईल तिथे कमी व्होल्टेज समस्या असून निरंतर वीज योजनेखाली ८० ठिकाणी नवे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर गणपती पूर्वी ही कार्यवाही होणार असल्याचे आम केसरकर म्हणाले. आंबोली चौकूळ गावांना स्वतंत्र वीज वहिनी ब्रेकर्स दिले हजार आहेत तशी मान्यता मिळाली आहे.

शेअर करा