वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; श्रद्धाराजे सावंत-भोसले यांची मदतीची ग्वाही.
सावंतवाडी,दि.३० जुलै
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकण यांच्या वर्धापन दिन दि.30/07/2026 रोजी उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.श्रद्धाराजे सावंतभोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण सभापती, तहसिलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे, समाजसेविका सौ.नानी कशाळीकर, केतन सावंत, डॉ.मनेश नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोंसले यांनी दृष्टीहीन संघटनेला सर्वतोपरी मदत देण्याची भावना व्यक्त केली. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व स्त्री रोगतज्ञ तथा उपजिल्हा रुग्णालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक डॉ.ज्ञानेश्व दुर्भाटकर यांच्यावतीने दिव्यांगाच्या मुलांना दरवर्षीप्रमाणे शालेय वह्या, छत्र्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, खजिनदार नंदा सावंत, सहसचिव प्रकाश वाघ, सहसचिव शाम माजगावकर, उपाध्यक्ष संतोष दळवी, उपाध्यक्ष सदानंद पावले, प्रशांत कदम, सुरेश दामले, वामन बिर्जे, शेजल आळवे, रंजना