सावंतवाडी : स्पेल बी स्पर्धेत इंग्लिश मेडीयम स्कूल, तळवडे चे घवघवीत यश

शेअर करा

सावंतवाडी,दि.३१ जुलै

हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धेत इंग्लिश मेडीयम स्कूल, तळवडे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपदके पटकावली.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत लहानग्यांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषतः हस्ताक्षर आणि चित्रकला या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून परीक्षकांचे कौतुक मिळवले.

शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसून येत होता.

विजेत्यांची यादी
इयत्ता – ६ वी

  1. शुभ्रा स्नेहल राऊळ – हस्ताक्षर स्पर्धा – गोल्ड मेडल
  2. आर्या पांडुरंग रेडकर – चित्रकला स्पर्धा – गोल्ड मेडल

इयत्ता – ४ थी

  1. आर्य श्रीप्रसाद बुगडे – चित्रकला – गोल्ड मेडल
  2. प्रांजल रितेश जळवी – हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा – गोल्ड मेडल
  3. पुर्वांग प्रमेश परब – हस्ताक्षर स्पर्धा – गोल्ड मेडल
  4. स्पर्श वामनराव सावंत भोसले – चित्रकला स्पर्धा – गोल्ड मेडल
  5. दिया अभिजीत वजरकर – चित्रकला स्पर्धा – गोल्ड
  6. ईशिता महादेव नाईक – चित्रकला स्पर्धा – गोल्ड
  7. राजवीर गोविंद पवार – JR. KG – डूडल्स डर्बी – गोल्ड

इयत्ता – २ री

  1. अनुज अजित शिरोडकर – चित्रकला स्पर्धा – गोल्ड मेडल
  2. रुद्र दिपेश माळकर – चित्रकला स्पर्धा
  3. कौस्तुभ दाजी तळवणेकर – चित्रकला स्पर्धा
  4. स्वरा नारायण दळवी – चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा
  5. राज पिकुळकर – हस्ताक्षर स्पर्धा
  6. अक्षरा अजित कापडी – चित्रकला स्पर्धा
  7. पर्णिका बंदिवडेकर – चित्रकला

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मैथिली नाईक, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका सौ. प्रणिता मयेकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा