सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर
माजगाव ग्रामपंचायत १५ वित्त अंतर्गत आणि सारथी फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक २ व ३ सप्टेंबर रोजी माजगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये दोन दिवशीय फ्लॉवर मेकिंग प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजगाव सरपंच सौ.रंजना कानसे, उपसरपंच श्री रिचर्ड डिमिलो ग्रामपंचायत सदस्य श्री संजय कानसे , सौ .मधु कुंभार , सौ विशाखा जाधव प्रशिक्षक सौ प्राची धुरी तसेच सारथी फाउंडेशन रिजनल मॅनेजर श्री पद्माकर शेटकर सीआरपी स्नेहा साळगावकर, पूर्व गावडे, प्रांजल शेटकर ,माया साळगावकर ,
पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सारथी फाउंडेशनचे श्री पद्माकर शेटकर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रमाची माहिती संस्थेच्या वतीने फिजा मकानदार यांनी दिली .दोन दिवशीय प्रशिक्षण प्राची धुरी यांनी फ्लॉवर मेकिंग प्रशिक्षण प्रात्यक्षिक सहित करून दाखवल्या व मार्गदर्शन केले या प्रशिक्षणामध्ये गावातील 55 महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला सर्व महिलांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र वितरित करून कार्यक्रमाचा ़ समारोप करण्यात आला तसेच सौ माधवी भोगण यांनी ग्रामपंचायतीचे व महिलांचे आणि सारथी फाउंडेशन चे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.