सावंतवाडी : गोव्याच्या संस्कृतीचा पणजीत घुमला आवाज! ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा दिमाखदार सोहळा!

शेअर करा

सावंतवाडी ,दि. २१ जून
“गोवा म्हणजे केवळ भोगभूमी अशी होणारी बदनामी थांबायला हवी आणि ८० टक्के ग्रामीण गोव्यात दडलेली खरी संस्कृती व सभ्यता जगापुढे यायला हवी!” असे परखड आणि कौतुकास्पद प्रतिपादन गोव्याचे सांस्कृतिक व कला मंत्री ना. रमेश तवडकर यांनी केले.

पणजीतील प्रसिद्ध पं. दीनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे पार पडलेल्या विसाव्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ च्या महाअंतिम फेरीच्या शुभारंभ प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

आयोजक: मार्सेल-गोवा सम्राट क्लब इंटरनॅशनल, गोवा कला व सांस्कृतिक मंत्रालय आणि सम्राट क्लब स्टेट-१ यांचा संयुक्त उपक्रम झाला.महागुरूंचे मार्गदर्शन: देशातील नामवंत शास्त्रीय गायक पं. डॉ. राम देशपांडे यांनी महागुरू म्हणून स्पर्धकांना शास्त्रीय संगीताच्या मोलाच्या टिप्स दिल्या.कडाडून टक्कर: एकूण ६ अंतिम स्पर्धकांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाला सम्राट क्लबचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सम्राट संदीप निगळ्ये, राज्य १ चे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी, सचिव सम्राट विनोद मळीक, कोषाध्यक्ष सम्राट सुबोध रामनाथकर, आणि यजमान मार्सेल क्लबचे अध्यक्ष सम्राट रोहन घाडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि मान्यवरांचा सन्मान:
या दिमाखदार सोहळ्याला सम्राट क्लब आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
सम्राट संदीप निगळ्ये (आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल)
सम्राट शशिकांत पुनाजी (अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट विनोद मळीक (सचिव, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट सुबोध रामनाथकर (कोषाध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट रोहन घाडी (अध्यक्ष, यजमान क्लब – सम्राट क्लब मार्शेल),नरेश पेडणेकर (अध्यक्ष, मये क्लब), मंगेश गांवकर आणि सौ. स्वप्ना मातोंडकर आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या उभारणीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये संस्थापक सम्राट सागर पानवेलकर, अक्षय खांडेपारकर, प्रसाद नाईक, योगेश हिरवे, भालचंद्र नाईक, दीपक टिळवे, गुरूदास नाटेकर, दीपक नार्वेकर, राजश्री खांडेपारकर, अविन नाईक, प्रसाद प्रभूगांवकर, अमोल फडते वेतकीकर, ॲड. अवधूत सलतकी, मंगेश गांवकर, अवधूत नाईक, पंकज नमशीकर, भालचंद्र नार्वेकर, अर्चना सिनारे, निखिल साळगांवकर आणि स्वप्ना मातोंडकर यांचा समावेश होता.

सिंधुदुर्गातूनही रसिकांची हजेरी!
या सुरांच्या महाकुंभाला गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः सावंतवाडी येथील नरेंद्र देशपांडे, आशुतोष चिटणीस आणि हरिश्चंद्र पवार यांच्यासह अनेक संगीतप्रेमींनी उपस्थित राहून दाद दिली!

शेअर करा