सावंतवाडी :नेमळे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; गुरूंचा सन्मान म्हणजे जीवनाला योग्य दिशा – संजय कात्रे

शेअर करा

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गुरूंचा आदर, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिक्षणातील प्रगतीचे महत्त्व पटवून दिले.

सावंतवाडी,दि.३० जुलै

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी .नेमळे शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वासुदेवानंद सरस्वती विद्यालय ,माणगाव शाळेचे माजी शिक्षक संजय कात्रे म्हणाले,”या जगात जे थोर होवून गेलेत त्याप्रत्येकांना थोर गुरू लाभल्यामुळे त्यांच्या जीवनाचे सोने झाले आहे.गुरूंचा मान राखला पाहिजे.तुमचे जीवन प्रकाशित करण्यासाठी ,अभ्यासात प्रगति व्हावी यासाठी शिक्षक नेहमी मार्गदर्शन करत असतात व एखादा फटका ही देतात म्हणून त्यांचेवरती राग धरू नये असे कात्रे सरांनी उद्‌गार काढले.”
गुरुपौर्णिमेनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात गुरूविषयी कृतज्ञता विद्यार्थ्यांनी भाषणातून व्यक्त केली.यामध्ये देवेश धुरी,साची केरकर प्राची कोळेकर , अनुष्का नाईक, रेश्मी नार्वेकर, साक्षी दळवी , लौकीक कदम यांनी भाषण केले.इंग्रजी मधून सोनाक्षी दळवी, लतिका मेस्री, सायमा आजगावकर यांनी भाषण केले.स्वराज कांदे यांने’ विठ्ठल माझा भेटला ‘ हे गीत म्हटले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय कात्रे यांचे संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ यांनी शाल , श्रीफळ , बुके देऊन सत्कार केला.यावेळी एम.पी सारंग,उमेश राऊळ,चंद्रकांत बंगाळ, क्रांती मयेकर, नूतन कडावलकर, आरती कोरगावकर उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले. आभार नितिन धामापूरकर यांनी मानले.

शेअर करा