सावंतवाडी,दि.३० जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजलि परिवारातर्फे दरवर्षी साजरा होणारा गुरुपौर्णिमा कार्यक्रम यंदा पतंजलि योगवर्ग, ओंकार बिल्डिंग, वैश्यवाडा (सावंतवाडी) या ठिकाणी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी विद्याधर पाटणकर, सह जिल्हाप्रभारी दत्तात्रय निखार्गे, भारत स्वाभिमान जिल्हा पूर्वप्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, ज्येष्ठ योगकर्मी सडेकर काका, सौ. सडेकर काकी, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी योगेश येरम, ज्येष्ठ योगशिक्षक दिलीप भाईप, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे, सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण राणे, किसान सेवा समिती तहसील प्रभारी नारायण राणे, ज्येष्ठ योगशिक्षिका डॉ. सौ. रोहिणी बांदेकर, सौ. अपर्णा भाईप, महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे, कोषाध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत, सह योगशिक्षक संजय म्हापसेकर, संदीप पाटे, डॉ. सौ. समता धुरी, योगसाधक तुकाराम कुमठेकर, पूजा शिरसाट, राधिका मुंज तसेच योगसाधक आदि उपस्थित होते.
योगवर्गामध्ये होम हवन करण्यात आले आणि आपल्या गुरुंना वंदन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे यांनी होमहवन केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि योगसाधकांना संबोधित करताना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सुद्धा विशद केले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून यावेळी गेली वीस ते पंचवीस वर्षे निस्वार्थ वृत्तीने आणि सद्भावनेने योगप्रचार आणि योगप्रसारासाठी निरंतर कार्यरत राहणाऱ्या आणि पतंजलीचा कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी अगत्यपूर्वक उपस्थित राहून मौलिक सहकार्य करणारे ज्येष्ठ योगकर्मी दत्तारामकाका सडेकर आणि सडेकर काकी या उभयतांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा महिला पतंजली समितीच्या सावंतवाडी समितीमार्फतसुद्धा गुरुपौर्णिमा कार्यक्रम पतंजलि योगवर्ग, पोलिस लाईन हॉल (सावंतवाडी) या ठिकाणी साजरा करण्यात आला.
उपस्थित महिला योगसाधकांनी योगनृत्य सुद्धा केले.
आजचा विशेष योगवर्ग महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे यांनी घेतला. तर सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे यांनी होमहवन केले.
पोलीस लाईन योगवर्गातील गुरुपौर्णिमा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलिस लाईन मधील महिला योगसाधकांनी उत्तम सहकार्य केले.