सावंतवाडी : श्री क्षेत्र दाणोली येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ जुलै
श्री क्षेत्र दाणोली येथे श्री समर्थ साटम महाराज यांच्या पावन संनिध्यात बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
​या उत्सवाच्या निमित्ताने पहाटे ५.१५ वाजता काकड आरती आणि पहाटे ५.३० वाजता अभ्यंगस्नान होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता पाद्यपूजा संपन्न होईल. सकाळी १०.०० वाजता श्री. संदेश सामंत यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
​दुपारी १२.३० वाजता महाआरती झाल्यानंतर दुपारी १.०० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी दुपारी १.०० वाजता श्री. बोघाटे बुवा यांचे भजन, तर दुपारी ३.०० वाजता श्री. अंकुश सांगेलकर यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.
​सायंकाळी ५.०० वाजता व्यासपूजा आणि सायंकाळी ७.०० वाजता महाआरती पार पडेल. त्यानंतर रात्री ९.०० वाजता व्यासपूजेसमोर ग्रामस्थांचे भजन संपन्न होणार आहे.
​या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा