सावंतवाडी : गुरुनाथ पेडणेकर यांचा सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या वतीने सत्कार

शेअर करा

सावंतवाडी ,दि.२८ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सदस्यपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
​गुरुनाथ पेडणेकर हे खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत. संघाचे संचालक तथा पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
​या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन राजन रेडकर, संचालक ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, आत्माराम गावडे, प्रवीण देसाई, अभिमन्यू लोंढे, विनायक राऊळ, विष्णू गावडे, सगुण जाधव तसेच व्यवस्थापक महेश परब आदी उपस्थित होते.

शेअर करा