नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले विठ्ठल सेवेत सहभागी; भजन, कीर्तन व सांगीतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सावंतवाडी ,दि.२३ जुलै
येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे हरिनाम वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सप्ताहाची सांगता होणार असून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत विठ्ठल सेवेत सहभागी झाल्या. या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज वारकरी भजन, कीर्तन, सांगीतिक कार्यक्रम होत असून भक्तीमय वातावरण निर्माण झाल आहे.
सप्ताहात निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम इथे होत आहेत. आज सप्ताहाची सांगता होणार असून याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत विठ्ठल सेवेत सहभाग घेतला. यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदींसह विठ्ठल भक्त उपस्थित होते.