सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा क्रमांक २ मधील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार; ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सावंतवाडी तालुक्याचा उपक्रम.
सावंतवाडी दि.२४ जुलै
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नं.२ च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. गुणवत्ता यादीत आलेल्या या शाळेच्या १४ ही विद्यार्थ्यांचे प्रशालेत संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.
यामध्ये कु.आराध्य आपटे हा विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम तर राज्यात नववा आला. त्याचबरोबर एकाच प्राथमिक शाळेतून विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवरील गुणवत्ता यादीत चमकल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शाळा समिती, पालक वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
या कौतुक सोहळ्याला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा व्हिजन आय प्लस शिरोडाचे प्रोप्राटर सोहन शारबिद्रे, उपाध्यक्ष तथा नगरसेविका सौ.शर्वरी धारगळकर, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सचिव सौ.मेघना साळगांवकर, बांदा शहर अध्यक्ष कृष्णा गवस, नितीन नाईक, सौ.साक्षी गवस, सौ.सुप्रिता धारणकर, सौ.पूजा नाईक, सौ.रेश्मा परब, कणकवलीतील ट्रॉफी हाऊसचे प्रोपायटर श्री. व सौ.महेंद्र चव्हाण तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सदरचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो:- ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना गौरवितांना संघटनेचे पदाधिकारी संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर, सोहन शारबिद्रे, नगरसेविका सौ.शर्वरी धारगळकर, सौ. शिवानी पाटकर, सौ. मेघना साळगांवकर व इतर.