​​सावंतवाडी : गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली शाळेची शौर्या सावंत जिल्ह्यात आठवी

शेअर करा

माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी, दि. ८ जुलै
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२५-२६ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर ५ ची विद्यार्थिनी कु. शौर्या भगवान सावंत हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने इयत्ता दुसरीमध्ये १०० पैकी ७६ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवा क्रमांक प्राप्त केला.
​शौर्या हिच्या या यशाबद्दल इन्सुली गावचे माजी उपसरपंच कृष्णा शिवाजी सावंत आणि शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेकानंद नाईक यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच तिचे अभिनंदन करण्यात आले.
​शौर्या हिला या परीक्षेसाठी वर्गशिक्षक हंसराज गवळे, सुधीर गावडे आणि मुख्याध्यापक भास्कर माजगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
​या सत्कार सोहळ्याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपेश सावंत, मुख्याध्यापक भास्कर माजगावकर, शिक्षक सुधीर गावडे, हंसराज गवळे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शौर्याच्या या यशामुळे इन्सुली गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा