सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर
मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचा समाज बांधव मेळावा मळेवाड येथील पतित पावन भक्ती मंदिर श्री गजानन महाराज मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात समाजातील गुणवंत व्यक्तींसह सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मदन मुरकर यांच्या कार्याची दखल घेत नाभिक समाज संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मदन मुरकर हे पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच स्थानिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत असून, समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी नाभिक समाज संघटनेचे नाभिक समाज संघटना सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष सुनील न्हावेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार, सल्लागार हनुमंत कारिवडेकर, चेतन तोरसकर, दयानंद वेंगुर्लेकर, मळेवाड पंचक्रोशी नाभिक समाज संघटना अध्यक्ष अजय न्हावी, उपाध्यक्ष नवनाथ तिरोडकर, सचिव आनंद न्हावेलकर, खजिनदार संदेश आरोसकर, सुरेश पाटील,नंदकिशोर चव्हाण, शांताराम वेतोरेकर, उत्तम न्हावेलकर, ज्येष्ठ पत्रकार गणेश चव्हाण , सखाराम चव्हाण, आनंद न्हावी, सिद्धेश न्हावी, पुरुषोत्तम न्हावी, अमित न्हावी , वसंत चव्हाण,यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सत्काराबद्दल मदन मुरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.