सावंतवाडी,दि.२६ जुलै
पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखिनीय कार्य करणारे सावंतवाडी येथील जोव्हेल डूमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगरतर्फे “सह्याद्रीचे शिलेदार – राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.
पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पहाट फाउंडेशनच्या निवड समितीने या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जोव्हेल डिसिल्वा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.