सावंतवाडी : मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटना स्थापन अध्यक्षपदी रमाकांत नाईक, उपाध्यक्ष अशोक शिरसाट

शेअर करा

सचिवपदी मदन मुरकर तर खजिनदार दिपक नाईक

सावंतवाडी,दि.२७ जुलै

मळेवाड बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त जकात नाका बाजारपेठ परिसरातील व्यापारी व दुकानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक, उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट, सचिवपदी मदन मुरकर आणि खजिनदारपदी दिपक नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.


यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले की, “मळेवाड बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे काम केले जाईल.”


संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी गुरुप्रसाद नाईक, कमलाकर राऊत, नंदकिशोर नाईक, संतोष गावडे, रवींद्र तळवणेकर, अशोक परब, मनीष केरकर, उमेश कारुडेकर, सुनील नाईक, ज्ञानेश्वर तुळसकर आणि अक्षय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारिणी निवडीच्या बैठकीस जकात नाका बाजारपेठ परिसरातील व्यापारी व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे प्रश्न संघटितपणे मांडले जाणार असून व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


माजी व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे तसेच सर्व व्यापारी दुकानदार बंधूंनी नवीन कार्यकारिणीच अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा