केक कापून कुटुंबियांनी दिल्या शुभेच्छा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मान्यवरांकडूनही अभिष्टचिंतन
सावंतवाडी दि.१८ जुलै
माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून साजरा करण्यात आला. केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
मुंबई निवासस्थानी वाढदिवस साजरा केला तेव्हा त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर, नातू अर्जून वगळ , मुलगी आदी उपस्थित होते. आमदार श्री. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. तसेच केसरकर यांच्या कुटुंबाकडून निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला.