सावंतवाडी,दि.२० जुलै
जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून सावंतवाडी नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत-भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री नीतेश राणे आहेत.
शासनातर्फे ही जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागातील आरोग्यविषयक समस्या, अडचणी येथे सोडविल्या जातात. सावंतवाडी शहरातील आरोग्यविषयक समस्या मांडण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा भोसले यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री राणे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्नाबद्दल सातत्याने चर्चा होऊन ते सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील,अशी अपेक्षा आहे.