सावंतवाडी,दि.१५ सप्टेंबर
सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोसले व भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती सौ.दिपाली दिलीप भालेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या भालेकर राजाचे दर्शन घेतले.
यावेळी सावंतवाडीच्या सर्व गणेश भक्तांना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, जय भालेकर, ओमकार भालेकर व सचिन सावंत आदी उपस्थित होते