सावंतवाडी,दि.२ जुलै
पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे जिमखाना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ‘नगराध्यक्ष चषक २०२६’ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ४ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. या क्रीडा महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले,सौ. शुभदादेवी खेम सावंत भोसले उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवाचे निमंत्रक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीम. श्रद्धा लखम सावंत भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. श्री. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर आहेत. तर स्वागतोत्सुक म्हणून सभापती श्री. सुधीर आडिवरेकर, श्री. मोतीराम नेवगी, सिताराम बांदेकर आणि श्रीम. दिपाली दिलीप भालेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यरत आहेत. सावंतवाडी आणि परिसरातील क्रीडाप्रेमी व नागरिकांनी या स्पर्धांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.