​सावंतवाडी : नाझिया डिसूझा यांची सावंतवाडी पथविक्रेता समिती सदस्यपदी बिनविरोध निवड; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते सत्कार

शेअर करा

​सावंतवाडी ,दि.२७ जुलै
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार सावंतवाडी शहरातील पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पथविक्रेता समिती सदस्य म्हणून नाझिया मनवेल डिसूझा यांची बिनविरोध निवड झाली आहे.


​या निवडीबद्दल गुरुकुल येथे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते नाझिया डिसूझा यांचा सत्कार करण्यात आला.
​पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये ही समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांचे हक्क आणि व्यापार यांचे संरक्षण केले जाते.


​या सत्कार प्रसंगी मनोज घाटकर, दीपक सावंत, भाजप अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष ड्यूमिंग अल्मेडा, राजा शिवाजी चौक समितीचे उपाध्यक्ष दिलीप पवार, मायकल माडतीस, श्रीयुत सांगेलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा