सावंतवाडी,दि.२७ जुलै
पुणे… येथील समाजविकास परिषदेच्या निगडी मधील मध्यवर्ती कार्यालयात सर्व साधारण सभा शिवाजीराव मंडले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी अॅड संतोष शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कॅप्टन अर्जुन लिंगले यांनी या समाज विकास परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम घेऊन समाजातील युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले
या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष शिवाजी मंडले सांगली, उपाध्यक्ष वाय पी नाईक बेळगाव सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष मधुकर मंमाळे धाराशिव, सचिव अॅड संतोष शिंदे पुणे, कार्याध्यक्ष कॅप्टन
अर्जुन लिंगले सांगली, खजिनदार आबा जाधव सांगली, संचालक प्रा शंकर जाधव सातारा, सुरेश नाईक चंदगड, कांचन जांबोटी मुंबई, राजाभाऊ चव्हाण लोणंद, सौ अश्विनी भोईटे वाघमोडे सोलापूर, या पदाधिकाऱ्यांचा सभेत अभिनंदन ठराव घेण्यात आला नूतन अध्यक्षांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
भविष्यात विविध उपक्रम राबविणे, वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.राज्यभरातून मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते आभार मधुकर मंमाळे यांनी मानले