सावंतवाडी,दि.०३ सप्टेंबर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्यांमध्ये निशांत तोरसकर यांच्यावर तालुका संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नगरपालिका निवडणुकीत पॅनेलसाठी उभ्या करण्यात आलेल्या २० उमेदवारांचे नियोजन व विविध कामांची जबाबदारी तोरसकर यांनी आपल्या कार्यालयामार्फत यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेसाठी केलेल्या कार्याची दखल व त्याची पोचपावती म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने सांभाळत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे तोरसकर यांनी सांगितले.
पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री. आदित्य ठाकरे, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री. वैभव नाईक तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तोरसकर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.