सावंतवाडी : नीरवडे ग्रामपंचायतीत जुना वाद उफाळला; दोन्ही गटांकडून परस्पर गुन्हे दाखल

शेअर करा

पूर्व वैमनस्यातून मारहाण, शिवीगाळ व धमकीचा आरोप; सुहास गावडे आणि नागेश गावडे यांच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांकडून परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद.

सावंतवाडी,दि.२७ जुलै
नीरवडे ग्रामपंचायत येथे पूर्व वैमनस्य तसेच जुन्या वादातून एकमेकांना मारहाण करून शिवीगाळ व धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात सुहास शंकर गावडे तर नागेश सुरेश गावडे यांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असुन याप्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.


नीरवडे ग्रामपंचायत येथे सोमवारी सायंकाळी साडे चार वा भर कार्यालयात मारामारीचा प्रकार घडला. यातील पाहिले तक्रारदार सुहास शंकर गावडे हे ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी विरोधक नागेश गावडे आले तक्रारदार सुहास गावडे यांनी विरोधक यांना कामांचे टेंडर भरण्यासाठी पैसे दिले होते ते परत कधी देणार अशी विचारणा केली असता याचा राग येऊन विरोधक नागेश गावडे यांनी तक्रारदार यांना हाता थपटानी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे त्यावरून विरोधक नागेश सुरेश गावडे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात तक्रारदार नागेश सुरेश गावडे यांनी पोलीस ठाण्यात आपली तक्रार दिली असून आपण संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयात गेलो असता तिथे विरोधक सुहास गावडे आले त्यांची पत्नी सरपंच आहेत त्यामुळे त्यांनी आपणास तू वारंवार ग्रामपंचायत विकास कामे आणि व योजनेची माहिती का मागतोस अशी विचारणा केली तर वारंवार माहितीचा अधिकारात माहिती मागितलीस तर बघून घेईन अशी धमकी दिली. यातील तक्रारदार पोट मक्ताने ग्रामपंचायत व नळ योजनेची कामे करतात त्याचे पैसे विरोधक यांनी मागितले असता तेव्हा तक्रारदार यांनी पैसे देणार नाही असे सांगितल्याने त्याचा राग धरून शिवीगाळ करत मारहाण केली व पुन्हा माहिती मागितलीस तर बघून घेईन अशी धमकी दिली अशी तक्रार नागेश गावडे यांनी दिली आहे त्यावरून सुहास शंकर गावडे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणात पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.

शेअर करा