चाळीस प्रवासी सुदैवाने बचावले
सावंतवाडी,दि.२७ जुलै
गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगाव जवळ दुचाकी वाहन चालकाला वाचवताना वाघबीळ येथील खोल दरीत जाता जाता वाचली.सदरील बस ही पणजी वरून वेंगुर्ले येथे जात असताना एका दुचाकी स्वाराला वाचविताना कलंडली. मात्र सुदैवानेच यातील चाळीस प्रवासी बाल बाल बचावले आहेत.
गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडा च्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ सायंकाळी सव्वा सहा वाजता आली असता घातक वळणावर समोरून मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने वर टॅग करत असताना त्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात सदर बस खोल दरीच्या काही फूट अंतरावर कलंडली सदर बस मध्ये एकूण चाळीस प्रवासी प्रवास करत होते सदर प्रवाशांना ग्रामस्थांनी आपत्कालीन दरवाज्यातून सुखरूप पणे बाहेर काढले. बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी माहिती दिली. या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही परं काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता परंतु सदर बस चालकाच्या प्रसंगवाधाने बस अलीकडेच कलंडली. दुचाकी स्वार दुचाकी गाडी टाकून पसार झाला. दुचाकीस्वाराच्या वाचवण्याच्या नादात ४० प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते परंतु चालकाच्या प्रसंगवधाने सदर घटना टळली.
धोकादायक या रस्त्याच्या बाजूने वळणावर दोन्ही बाजूने झाडी वाढली असून या वाघबीळ रस्त्याकडील दरीकडील लोखंडी संरक्षक रेलिंग दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.त्यामुळे बांधकाम विभागाने या समस्यांबाबत तत्काळ दखल घेण्याची मागणी आजगाव प्रभारी सरपंच सुशील कामटेकर यांनी केली आहे.