जिल्हा परिषदेकडून वाहन सुपूर्द; अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते चावी प्रदान
सावंतवाडी, दि. ६ जुलै
सावंतवाडी पंचायत समिती सभापतींना वाहन नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. गटविकास अधिकारी यांचे वाहन त्या वापरत होत्या. आज सभापती यांना जिल्हा परिषदेकडून हक्काचे वाहन देण्यात आले असून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते वाहन सुपुर्द करण्यात आले.
सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांना हक्काचे वाहन नसल्याने मोठी गैरसोय होत होती. तसेच गटविकास अधिकारी यांचे वाहन त्यांना वापरावे लागत होते. अखेर आज जिल्हा परिषदेकडून हक्काचे वाहन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते हे वाहन सुपुर्द करण्यात आले आहे. यावेळी यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, काका कुडाळकर, रूपेश कानडे, सावंतवाडीचे गटविकास अधिकारी
निलेश जाधव, शितल कुंड, जितेंद्र सावंत आदींसह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.