सावंतवाडीत ३ ऑगस्टला ‘रानभाजी आस्वाद कार्यक्रम’ व प्रदर्शन; नगरपरिषदेचे महिलांना सहभागी होण्याचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी,दि.२२ जुलै
पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पौष्टिकता आणि त्यांची ओळख नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीतर्फे ‘रानभाजी आस्वाद कार्यक्रम’ (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे.
​हा कार्यक्रम रविवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३:३० वाजता बॅ. नाथ पै सभागृहाबाहेरील मोकळ्या पॅसेजमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन व स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ३१ जुलै पर्यंत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील श्रीम. परवीन शेख (मो. ८५५०९५०७२१) यांच्याकडे नोंदवावीत.
​सावंतवाडी शहरातील सर्व महिलांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले, महिला व बालकल्याण सभापती श्रीम. दिपाली भालेकर आणि उपसभापती श्रीम. सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.

शेअर करा