सावंतवाडी : धाकोरे शाळा नंबर एक मध्ये सहज योग शिबिर संपन्न

शेअर करा

सावंतवाडी,दि.२७ जून

आजची बदलती जीवनशैली व मोबाईलच्या जमान्यात मुलांना एकाग्रता वाढीस लावणे अभ्यासात सातत्य टिकवणे, खेळाविषयी व योगा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे नं १ येथे सहज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन वर्गासाठी डॉक्टर श्री. बुरुड ,अमृता कदम , सोनाली कांबळी शेखर कांबळी व श्री.कुंभार यांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी योगसाधना प्राणायाम व आपल्यातील कुंडलिनी शक्ती जागृत करणे व त्याचा जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याबाबत प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मुलांकडून व उपस्थित पालक वर्गाने ध्यानसाधना केली.
यावेळी प्राणायाम योग्य प्रकारे कसे करावे श्वासावर नियंत्रण कसे ठेवावे यावर अमृता कदम यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर व ज्येष्ठ नागरिक सदगुरु मुळीक यांनी केले तर शाळेचे सहाय्यक शिक्षक सोनल जाधव यांनी आभार मानले.

शेअर करा