सावंतवाडी :ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचे सुपुत्र समर्थ गावडे यांचे निधन

शेअर करा

सावंतवाडी,दि.१६ जुलै

कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेलचे संपादक जेष्ठ पत्रकार तथा सकल मराठा समाज व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा व्दितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६) याचे बुधवारी १५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले.
समर्थ गेली पंधरा वर्षे आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी अखेर त्याची प्राणजोत मालवली. बुधवारी रात्री उशिरा त्याच्या पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्चात आई संयुक्ता, वडील सीताराम, भाऊ साईश, बहिणी, काका, काकी असा परिवार आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर करा